धक्कादायक! अहमदाबाद विमान अपघाताला वैमानिक जबाबदार ?  अमेरिकन रिपोर्टचा मोठा दावा
धक्कादायक! अहमदाबाद विमान अपघाताला वैमानिक जबाबदार ? अमेरिकन रिपोर्टचा मोठा दावा
img
दैनिक भ्रमर
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघाताविषयी रोज नवे नवे खुलासे होत असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.  एअर इंडिया विमानातील कॅप्टनने विमानाच्या इंजिनचे फ्यूल बंद केले होते, असे दोन्ही वैमानिकांमधील शेवटच्या संभाषणाच्या कॉकपिट रेकॉर्डिंगवरुन दिसून आले आहे, असा दावा अमेरिकन मीडिया वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. 

वॉल स्ट्रीट जर्नलने या प्रकरणात तज्ज्ञ, अमेरिकन वैमानिक आणि तपासावर लक्ष ठेवणाऱ्या सुरक्षा तज्ज्ञांचा हवाला देला. प्राथमिक अहवालात दिलेल्या तपशीलांवरून विमानाच्या कॅप्टनने स्वत: स्विच बंद केले होते असे दिसून येते. स्विच बंद करणे अपघाती होते की जाणूनबुजून होते हे अहवालात नमूद केलेले नाही. 

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, बोईंग ७८७ ड्रीमलाइनर उडवणाऱ्या फर्स्ट ऑफिसरने अनुभवी कॅप्टनला 'तुम्ही रनवेवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच स्विच कटऑफ स्थितीत का ठेवला', असे विचारले होते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये फर्स्ट ऑफिसर घाबरुन गेला होता, तर त्याच्या सोबतचे विमानाचे कॅप्टन शांत होते, असा उल्लेख करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group