कल्याण : आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आता याच विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक देण्यास नकार देणं एका शाळेला महागात पडलं आहे.
शाळेने निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक देण्यास नकार त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी डोंबिवलीतील शाळेने शिक्षक देण्यास नकार दिला.
त्यानंतर राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूरी केल्याचा ठपका ठेवत डोंबिवलीमधील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या शाळेने आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार दिला होता. त्यानंतर शाळेने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठ्याची फिर्याद, 134 अंतर्गत गुन्हा
आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शाळेतील शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार दिल्याने डोंबिवलीतील एमआयडीसीमधील सिस्टर निवेदिता शाळेच्या प्रशासनाविरोधात डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाने कर्मचारी वर्ग देण्यास नकार दिला, या शाळेने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूर केल्याने शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे. महसूल विभागाचे डोंबिवली एमआयडीसी परिसराचे तलाठी लक्ष्मण नाना शिंदे यांनी याप्रकरणी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या आदेशावरून सिस्टर निवेदिता शाळेविरुद्ध तक्रार केली आहे. त्यानंतर, हा गुन्हा दाखल करण्यात आला.