धक्कादायक : विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात ; कुठे घडली घटना? वाचा
धक्कादायक : विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात ; कुठे घडली घटना? वाचा
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसचा अपघात झाल्यची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली लोहगाव रोडवर १० ते १५ मुलांनी भरलेली बस आणि डंपरचा किरकोळ अपघात झाला. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पुण्यातील लोहगाव रोडवर ग्रीन रिपब्लिक सोसायटीसमोर ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील खराडी येथील कोठारी इंटरनॅशनल स्कूलची बस मुले घेण्यासाठी लोहगाव रोडवरील सोसायटीमध्ये आली होती. विद्यार्थ्यांनी भरलेली बस सोसायटीतून बाहेर पडताना बस अर्ध्या रस्त्यावर आली. लोहगावकडे भरधाव जाणारा क्रॉंकिट डंपर हा बसवर आदळला असता. मात्र, डंपर चालकाने रस्त्यावर खाली डंपर घातला. तरीही बसच्या पुढील भागाला डंपरची धडक बसली. या किरकोळ अपघातानंतर उपस्थित नागरिक धावत बसजवळ गेले.

त्यावेळी त्यांना मुले सुरक्षित असल्याचे त्यांना दिसले. अपघातात बसचा पुढील भाग तुटला. त्यानंतर त्या परिसरातील सोसाटीतील नागरिकांनी पोलिसांना कॉल करून घटनेची माहिती दिली. लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधला. दैव बलवत्तर म्हणून अपघात झाला नाही, बसला किरकोळ धडक बसली. 

दरम्यान या अपघातानंतर मुले सुरक्षित आहेत. मात्र, बस व डंपर चालक या दोन्ही बेजबाबदार चालकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group