पुण्यात GBS चा कहर कोंबड्यांमुळे ? काय आहे अहवाल ?
पुण्यात GBS चा कहर कोंबड्यांमुळे ? काय आहे अहवाल ?
img
दैनिक भ्रमर
पुण्यात GBS ने  कहर केला असून सुरुवातीला सामान्य वाटत असलेल्या या रोगाने मात्र आता हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ११ रुग्णांचा जीबीएस लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, आता जीबीएस उद्रेक झाल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने सिंहगड रस्त्यावरील कुक्कुटपालन केंद्रांमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये जीवाणू आणि विषाणू आढळले आहेत. याबाबतचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेकडून (एनआयव्ही) पशुसंवर्धन विभाग आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे.

सिंहगड रस्ता भागातील धायरी, किरकीटवाडी, सणसवाडी, नांदेड आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीबीएस या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. हा आजार दुषित पाण्यामुळे होत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केल्यानंतर महापालिकेने या परिसरातील विविध ठिकाणच्या पाण्याचे नमूने तापसणीसाठी घेतले होते. यामध्ये पाण्यात दोष आढळलेल्या खासगी आर.ओ. प्रकल्प सिल केले होते.

याशिवाय या परिसरातीस कुक्कुटपालन केंद्रांमधील कोंबडयांमध्ये‘जीबीएस’ ला कारणीभूत ठरणारा ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू हा जीवाणू आहे का किंवा त्यांच्यापासून पाण्याचे स्रोत दूषित होत आहे का, हे पाहण्यासाठी नमुने घेतले होते यानुसार कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांच्या गुदूद्वारातील नमुने, त्यांची विष्ठा व तेथील माती, पाणी यांचे नमुने घेण्यात आले होते.

त्यानुसार, २३ नमुने कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी पॉझिटिव्ह आणि ५ नमुने नोरोव्हायरस पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तपासणीसाठी खडकवासला पाणीसाठ्यापासून ५ ते ६ किलोमीटर परिसरातील १ केंद्रे तपासण्यात आली होती. केंद्रांमधून उत्सर्जित सांडपाणी नजीकच्या स्त्रोतात मिसळत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group