''या'' शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती
''या'' शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती
img
दैनिक भ्रमर
नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाले असून नवी वर्षाची जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये जय्यत तयारी सुरु असून त्या अनुषंगाने तेथील प्रशासन देखील सज्ज झाले आहे. नवीन वर्षात सर्वच ठिकणी जल्लोष पाहायला मिळतो नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वाधिक जल्लोष मनवला जातो. या पार्श्वभूमीवर नागरिकांची आबाळ होऊ नये म्हणून सर्वच शहरांतील प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे.  दरम्यान, पुणे शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 

 पुण्यातील लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता गर्दीने फुलून जातो. आज सायंकाळी 5 वाजलेनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ‘मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

तसेच , कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group