नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील महाळुंगे येथील गिरनार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. पुण्यातील महाळुंगे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला. ३१ डिसेंबर रोजीची ड्युटी करून घरी परत जाताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार , जितेंद्र गिरनार असे उपनिरीक्षकाचं नाव आहे. त्यांची महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये पोस्टिंग होती, थर्टी फर्स्टला ते ड्युटीवर होते. बंदोबस्त चोख बजावल्यानंतर ते घरी परतण्यासाठी निघाले, त्यावेळी काळाने घाला घातलाय.
पोलीस उपनिरीक्षक गिरनार हे पूर्वी वाकड पोलीस स्टेशनला कार्यरत होते. तेथून त्यांची बदली महाळुंगे पोलीस स्टेशनला झाली. ३१ डिसेंबर रोजी रात्रपाळी करून घरी परत निघालेल्या गिरनार यांच्या कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील महिंद्रा कंपनीजवळ झालेल्या या अपघाताची चौकशी सुरू आहे.