धक्कादायक!  पिझ्झा मागवला म्हणून विद्यार्थिनींना हॉस्टेल बाहेर काढलं, कुठे घडली घटना ?
धक्कादायक! पिझ्झा मागवला म्हणून विद्यार्थिनींना हॉस्टेल बाहेर काढलं, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
पिझ्झा हा लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतो. कॉलेज चे विद्यार्थी देखील खूप आवडीने पिझ्झा खातात. त्यात घरापासून लांब राहणारे मुलं फास्ट फूड म्हणून पिझ्झा खायला पसंती देतात. पण एका वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना पिझ्झा मागवणे चांगलेच महागात पडले आहे. चक्क हॉस्टेलमध्ये पिझ्झा मागवला म्हणून  विद्यार्थीनींना  हॉस्टेलमधून बाहेर काढल्याची धकाकदायक घटना घडली आहे. 

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून ही  घटना समोर आली आहे. पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह आहे. याच ठिकाणी असलेल्या काही विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी खाण्यासाठी पिझ्झा मागवला होता. मात्र, वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी यावर आक्षेप नोंदवला अन् कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार ,  मुलींनी पिझ्झा मागवल्याचं वसतिगृहाच्या गृहप्रमुख मिनाक्षी नारहारे यांना कळालं आणि त्यांनी एक अजब फतवा जारी करत केला. एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनी पैकी नेमका पिझ्झा कुणी मागवला? हे स्पष्ट होत नसल्याचं कारण देत चौघींनाही एका महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घातल्याची घटना समोर आली आहे. मिनाक्षी नारहारे यांनी काढलेल्या या अजब फतव्याने समाज कल्याण विभाग देखील हारदलं आहे.

हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेरील व्यक्ती किंवा खाद्य पदार्थ आणण्यास नियमानुसर बंदी आहे. मात्र, हा नियम मुलींनी मोडला आणि पिझ्झा मागवला होता, त्यामुळे कारवाई केली जात असल्याचं विद्यार्थिनी आणि पालकांना एका लेखी पत्राद्वारे कळविण्यात आलंय. मात्र, अशा चुकांसाठी विद्यार्थिनी प्रवेश बंदी करण्याचे आदेश समजिक न्याय विभागाने परित केले आहेत का? याचा खुलासा होत नसल्यानं पालकांमध्ये संताप आहेत.

दरम्यान, एकीकडे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट मंत्रीपद मिळाल्यानंतर अॅक्टिव मोडवर दिसत आहे. पदभार स्वीकारल्यानंतर शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृहाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या गैरसोईवरुन अधिकाऱ्यांना तंबी देखील दिली होती. सरकार विद्यार्थ्यांना काही कमी पडू देणार नाही, असं आश्वसन देखील त्यांनी दिलं होतं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group