धक्कादायक घटना : पत्नीची गळा आवळून हत्या केली , अन् मग मध्यरात्री मृतदेह घेऊन....
धक्कादायक घटना : पत्नीची गळा आवळून हत्या केली , अन् मग मध्यरात्री मृतदेह घेऊन....
img
Dipali Ghadwaje
पुण्यात मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मध्यरात्री दुचाकीवरुन पत्नीचा मृतदेह घेऊन शहरात फिरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या माथेफिरु आरोपीला अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री साधारणे 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. राकेश रामनायक निसार असं आरोपीचे नाव असून त्याने पत्नी बबिता राकेश निसार हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क दुचाकीवरुन तिचा मृतदेह घेऊन प्रवास करत होता. नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 
 
नेमकं काय घडलं ?

भूमकर पुलाकडून राकेश बायकोचा मृतदेह घेवून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. दुचाकीवरुन मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला आडवले. त्यानंतर त्याचे बिंग फुटले. आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला  बेड्या ठोकल्या आहेत. राकेशने पत्नीची हत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून राजेशची चौकशी केली आहे. त्याचबरोबर मोबाइल कॉल रेकॉर्ड आणि घरगुती संबंध याबाबींचाही तपास केला जात आहे. मात्र, पत्नीची हत्या करुन मृतदेह सार्वजनिक ठिकाणी नेण्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group