महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पु्न्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार हे आमचे दैवत आहे असं म्हणत अजित पवार गटाने दोन्ही पवार एकत्र येण्याविषयी सुचक संकेत दिले होते. या विधानावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही प्रतिक्रिया दिलीय.
दोन्ही पवार एकत्र येणं हे काही भातुकलीच्या खेळा इतकं सोपं नाहीये, असं म्हणत दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा अमोल कोल्हेंनी एकाच वाक्यात संपवल्या.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार ह्या पंढरपूरला गेल्या होत्या. तेथे विठुरायांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपलं कुटुंब पुन्हा एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर अजित पवार गटाकडूनही त्याबाबत सकारात्मक विधान करण्यात आली होती. त्यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी चाकणमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
हे भातुकलीच्या खेळा इतकं सोपं नाही अजित पवारांच्या आईने दोन पवार एकत्र येण्यावरुन भाष्य केलं त्यांची इच्छा कौटुंबिक होती. मात्र कौटुंबिक आणि राजकिय अर्थ वेगवेगळे आहे, ७६ लाख मतदारांनी पक्ष ,विचारधारेला मतदान केलं या मतदारांनी कोणाच्या तरी विरोधात मतदान केलं. ७६ लाख मतदारांचा विचार गृहीत धरायला हवा दोन पवार एकत्र येणार हे भातुकलीच्या खेळा इतकं सोपं नाही. मतदार कार्यकर्त्याचा विचार करुन शरद पवार योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही यावेळी अमोल कोल्हेंनी व्यक्त केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे. यावर खासदार कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत चर्चा संपवल्या आहेत.