नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांमध्ये उत्साह वाढवा म्हणून निरनिराळया गोष्टी आयोजित करून लोकांना आकर्षित केले जाते पण एका पबकडून चक्क आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आलं होतं. त्यानंतर मोठा वाद उद्भवला होता. पुण्यातील मुंढवा भागातील नामांकित पबमध्ये होणारी पार्टी अखेर रद्द करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून या पबला काल नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर आता पार्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली होती तसेच या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले होते.
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी शहरात अनेक मोठ्या ठिकाणी पार्टीचं आयोजन केलं जातं. अशातच पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबने कंडोम आणि ओआरएसचं फुकट वाटप केलं होतं. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर मोठा वाद उद्भवला होता. पोलिसांनी या प्रकरणात नोटीस पाठवल्याने अखेर पार्टी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यात ठिकठिकाणी थर्टी फर्स्टसाठी पार्टीचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामुळे पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात कारवाईचा बडगा पहायला मिळू शकतो.