बापरे ... ! आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मग....; कुठे घडला धक्कादायक प्रकार?
बापरे ... ! आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मग....; कुठे घडला धक्कादायक प्रकार?
img
Dipali Ghadwaje
पुण्यातुन एक धक्कादाक घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात घटना घडली आहे. सिंहगड पायथा परिसरात फिरायला गेले असता त्यांचे अपरहण करण्यात आले. आणि अवघ्या एका तासात त्यांची हत्या करण्यात आली. मृतदेहाचे तुकडे करून ते खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून देण्यात आले. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. 

याप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. तर या हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डोणजे गावामध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक विठ्ठल सखाराम पोळेकर (७० वर्षे) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोळेकर हे नेहमीप्रमाणे गावानजीक असलेल्या सिंहगडाच्या पायथ्याला मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. खंडणीसाठी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. पोळेकर घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आले. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली. शुभम पोपट सोनवणे, मिलिंद देविदास थोरात, रोहित किसन भामे यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबू किसन भामे हा अद्याप फरार आहे. रोहित आणि योगेश हे सख्खे भाऊ आहेत. 

शुभम आणि मिलिंद हे दोघे अहमदनगरचे असून ते सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये कामाला होते. त्यांना पैशांचे आमीष दाखवून योगेशने त्यांचा पोळेकर यांची हत्या करायला लावली.  आरोपी मोटारीतून नाशिकच्या दिशेने गेले असून त्यात भामे याच्यासमवेत शुभम सोनवणे आणि मिलिंद थोरात असल्याचे समोर आले. 

पोलिसांनी नाशिकमध्ये आरोपींचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी रेल्वेने मध्यप्रदेशमधील जबलपूरला गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जबलपूर पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना रविवारी अटक केली. याप्रकरणी तिघे अटकेत असून मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group