गुजरात पोलिसांना अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात यश आलं आहे. गुजरातमध्ये पोलिसांनी 80 कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. कच्छ जिल्ह्यातील गांधीधाममध्ये पोलिसांनी हे 80 किलोंचं कोकन जप्त केलं आहे. याची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत 800 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी किनार्यावरून 80 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 800 कोटी रुपये आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी शोध सुरु केला. यावेळी पोलिसांना समुद्रात लावारिसपणे अंमली पदार्थांची पाकीटे सापडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान पोलिसांना अंमली पदार्थ तस्करी संदर्भात माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला आणि ड्रग्स तस्करांचा प्लॅन उधळून लावला. पोलिसांच्या भीतीने तस्करांना 80 किलोंचे ड्रग्स समुद्री किनारी लावरीसपणे टाकून पळ काढल्याचा अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "गांधीधाम पोलिसांनी 80 किलो कोकेन जप्त केलं, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे. या यशाबद्दल मी डीजीपी आणि गांधीधाम पोलिसांचे अभिनंदन करतो."