मोठी बातमी! मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली ; टँकर चालकांचा संप अखेर मागे
मोठी बातमी! मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली ; टँकर चालकांचा संप अखेर मागे
img
Dipali Ghadwaje
मुंबईतील टँकर चालकांनी अखेर संप मागे घेतला. मुंबई मनपा आयुक्तांच्या बैठकीमध्ये तोडगा निघाल्यानंतर टँकर असोसिएशनने संप मागे घेण्याबाबत निर्णय घेतला. वॉटर टँकर असोसिएशनने पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला.

संप मागे घेतल्यानंतर आजपासूनच टँकर चालक कामावर रुजू होणार आहेत. मुंबई महानगर पलिका केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीला विरोध करत मुंबईतील टँकर चालक असोसिएशनने संप पुकारला होता.

गेल्या चार दिवसांपासून त्यांचा हा संप सुरू होता. पण आज दुपारी मुंबईतील टँकर चालक असोसिएशनची मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली.

या बैठकीमध्ये अखेर तोडगा निघाला. त्यानंतर टँकर चालकांनी चार दिवसांनंतर आपला संप मागे घेतला. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला.

एकीकडे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत चालला आहे. अशामध्ये मुंबईमध्ये टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे मुंबईवर पाणी संकट ओढावले होते.

या संपामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता खूपच वाढली होती. मुंबईतल्या अनेक रहिवासी परिसर, बिल्डिंग, सोसायटींना अनेकदा टँकरने पाणी पुरवठा केला जातो. टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत होते. पण आता टँकर चालकांनी संप मागे घेतल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. संप मागे घेतल्यामुळे आजपासूनच टँकरचालक कामावर रुजू होणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group