गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. बाप्पाच्या आगमनासाठी आपण सर्वच खूप उत्सुक असतो. आपल्या घरात बाप्पांचे आगमन होणार म्हणून प्रत्येक गोष्ट कशी परिपूर्ण आणि शुभ असेल याची काळजी आपण घेतो. गणेश आगमना नंतर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना कोणत्यावेळीकरायची याची माहिती जाणून घेऊया…
आपण जरी घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असाल तर यासाठी देखील एक शुभमुहुर्त आहे. सात सप्टेंबर रोजी आपल्या घरात बाप्पााच्या मूर्तीला सात सप्टेंबरला रोजी दुपारी प्रतिष्ठापना करु शकता. हा शुभकाळ सकाळी 11.03 वाजता सुरु होऊन तो दुपारी 1.34 वाजेपर्यंत असणार आहे.म्हणजे साल 2024 च्या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या प्रतिष्ठापणेचा मुहूर्त तब्बल 150 मिनिट मिनिटे असणार आहे.
दरम्यान , भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्मदिन म्हटले जाते. 2024 मध्ये 7 सप्टेंबर शनिवारच्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.चतुर्थीची तिथी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3.01 वाजता सुरु होईल आणि ती दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबर 2024 रोजी सायं. 5.37 वाजता समाप्त होईल. श्रीगणेशाचा जन्म दुपारी झाला आहे, त्यामुळे दुपारच्या वेळ श्रीगणेशाची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जात आहे.
तीन शुभ मुहुर्त कोणते ?
गणेश चतुर्थीच्या मुहू्र्तावर अनेक शुभ योग देखील आहेत. त्यामुळे या दिवसाला अधिकच महत्व आहे. यात सर्वार्थ सिद्धी मुहूर्त देखील सामील आहे.या दिवशी सर्व ग्रहांची स्थिती चांगली असल्यानेही या काळात पूजा केल्याने त्याचे फळ देखील चांगले मिळते. हा शुभमुहुर्त 7 तारखेला दुपारी 12.34 वाजता सुरु होऊन तो दुसऱ्या दिवशी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 06.03 वाजेपर्यंत असणार आहे.
या शिवाय रवि योग देखील या चतुर्थीला आहे. हा रवियोग सहा सप्टेंबर सकाळी 9.25 वाजता सरु होईल आणि सात सप्टेंबर रोजी दुपारी 12.34 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी ब्रह्म योग देखील निर्माण होणार आहे. या मुहूर्ताच्या निर्मितीला देखील पवित्र मानले गेले आहे.