राज्यातील नागरिकांसाठी आता एक गोड बातमी आहे. राज्य सरकार गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाखांहुन अधिक शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार असल्याची माहिती आहे.
याबाबत राज्य सरकारकडुन जीआर / शासनादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया २१ ऐवजी ८ दिवसात पुर्ण करणार आहेत.
गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा यंदाचा गणेशोत्सव गोड होणार आहे. कारण राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा निविदा प्रक्रिया आणि ५६० कोटींच्या खर्चास जीआरद्वारे मान्यता देण्यात आलीय.
आनंदाच्या शिध्यात काय काय मिळणार?
गौरी गणपती उत्सवानिनित्त प्रत्येकी 1 किलो रवा, चनाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ याकाळात हा शिधावाटप करण्यात येणार आहे. या शिध्याच्या प्रत्येक संच रूपये शंभरप्रमाणे सवलतीच्या दरात वितरीत केला जाणार आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया ८ दिवसांत पुर्ण केली जाणार आहे.