महत्वाची बातमी : रेशन कार्ड केवायसी कसं करायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत घ्या जाणून
महत्वाची बातमी : रेशन कार्ड केवायसी कसं करायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत घ्या जाणून
img
Dipali Ghadwaje
रेशन कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डसाठी केवायसी करणे गरजेचे आहे. दर पाच वर्षांनी केवासयी करणे गरजेचे आहे.

दरम्यान, आता केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते. तुम्हाला मोफत धान्य मिळणार नाही. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड केवायसी करु शकतात.

रेशन कार्डची केवायसी तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानावर जाऊनदेखील करु शकतात. दुकानावर जाऊन तुम्ही आधार कार्ड द्यायचे आहे. त्यानंतर रेशन कार्ड दुकानदार तुमची केवायसी करेल.

दुकानदार पीओएस मशिनद्वारे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करेल. त्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होणार आहे. याचसोबत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

केवायसी करण्याची ऑनलाइन पद्धत 

  • सर्वात आधी तुम्हाला Mera KYC आणि Aadhaar FaceRD अॅप डाउनलोड करायचा आहे.
  • यानंतर तुमचे लोकेशन टाकायचे आहे. तुम्ही ज्या राज्याचे रहिवासी आहात ते टाकायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला आधार नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाकायचा आहे.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या आधारची माहिती स्क्रिनवर दिसेल. यानंतर तुम्ही Face e-KYC हा ऑप्शन निवडा.
  • यानंतर कॅमेरामधून तुमचा फेस केवायसी होईल.
  • त्यानंतर फोटोवर क्लिक करा आणि सबमिट करा.
  • यानंतर तुमची रेशन कार्ड केवायसी पूर्ण होणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group