रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ... नाहीतर होईल रेशनकार्ड बंद, 'इतकेच' दिवस शिल्लक
रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ... नाहीतर होईल रेशनकार्ड बंद, 'इतकेच' दिवस शिल्लक
img
Vaishnavi Sangale
रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशनकार्डमुळे कमीत कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेमुळे खूप फायदा होतो. दरम्यान, आता सरकारने रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता केवायसी करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

रेशन कार्ड केवायसी करणे गरजेचे आहे. आता ३१ जुलै २०२५ पर्यंत रेशनकार्डधारक केवायसी करु शकतात. त्यामुळे तुम्ही जर अजूनही रेशन कार्ड केवायसी केले नसेल तर तुमच्याकडे अजून फक्त १० दिवस आहेत. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड केवायसी करु शकतात. ऑनलाइन केवायसी करायचे असेल तर Mera e-KYC या अॅपवर करावे लागेल.

याचसोबत तुम्ही जवळच्या रेशन दुकानावर जाऊनदेखील केवायसी करु शकतात. जर तुम्हाला आधारकार्ड आणि रेशन कार्ड लिंक करायचे असेल तर rcms.mahafood.gov.in या वेबसाइटवर जाऊन करा. याचसोबत तुम्हाला शिधावाटप कार्यालयात जाऊनदेखील आधार आणि रेशन कार्ड लिंक करु शकतात.

रेशन कार्ड ईकेवायसीसाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि बायोमॅट्रिक करणे आवश्यक आहे.याचसोबत दर तुमचे आधार आणि रेशन कार्ड लिंक असेल तर तु्म्ही ऑनलाइन सोप्या पद्धतीने केवायसी करु शकतात. केवायसी केले नसल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. याचसोबत तुमचे रेशन कार्ड निष्क्रिय देखील केले जाऊ शकते. त्यामुळे स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्याचा लाभ मिळणार नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group