रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्ड केवयासी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही रेशन कार्ड केवायसी केले नाही तर तुमचे कार्ड बंद होणार आहे. रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही रेशन कार्डचं केवायसी करु शकतात.
रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे. त्यामुळे ज्या लोकांनी अजूनही रेशन कार्ड केवायसी केले नसेल त्यांनी लगेचच करावे. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल.
तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड दुकानात जाऊन देखील हे काम करता येणार आहे. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला इथून पुढे कधीच रेशनचा लाभ घेता येणार नाही.
रेशन कार्ड ई केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ होती. त्यानंतर ही डेडलाइन वाढवण्यात आली आहे. आता ३० जूनपर्यंत तुम्ही हे काम करा.
केवायसी करण्याची ऑफलाइन पद्धत
- तुम्हाला जवळच्या रेशन दुकानात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जायचे आहे.
- यानंतर रेशन कार्ड आणि सर्व कुटुंबासोबत आधार कार्ड घेऊन जायचे आहे.
- यानंतर रेशन दुकानदार बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करेल.
- यानंतर तुमचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक होईल आणि तुमचे केवायसी पूर्ण होईल.
ऑनलाइन पद्धत
- सर्वात आधी तुम्हाला मेरा राशन किंवा आधार फेस RD अॅप डाउनलोड करायचा आहे.
- यानंतर आधार नंबर आणि ओटीपी टाकून वेरिफाय करा.
- यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फेस स्कॅन करा.
- यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.