''या'' कारणाने उच्च न्यायालयाने  गुणरत्न सदावर्तेंना झापलं !
''या'' कारणाने उच्च न्यायालयाने गुणरत्न सदावर्तेंना झापलं !
img
दैनिक भ्रमर
अभिनेता सलमान खान सूत्रसंचलन करत असलेला  लोकप्रिय शो हिंदी बिग बॉसच्या अठराव्या पर्वात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. दरम्यान ,न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी निर्णयाप्रत आलेली असताना युक्तिवादाच्या वेळी ते कसे काय गैरहजर राहू शकतात, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला.

हे तेच सदावर्ते आहेत, ज्यांनी आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून विनंती केली होती. युक्तिवाद करण्याची वेळ आल्यावर ते कसे काय गायब होऊ शकतात”, असा सवाल विचारून मुंबई उच्च न्यायालयाने गणरत्न सदावर्ते यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान , मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला आहे. आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असे उच्च न्यायालयाने बजावून सांगितले. दुसरीकडे पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची उच्च न्यायालयासमोरील पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group