अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अखेर आला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज 3 जानेवारी रोजी निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अदानी समूहाला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
अदानी हिंडनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निकाल दिला आहे. अदानी- हिंडनबर्ग प्रकरणात कोणत्याही एसआयटी चौकशीची गरज नाही.. असे म्हणत सुप्रीम कोर्टाने अदानी समुहाला क्लिनचीट दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात अदानी समुहाला दिलासा दिला असून हे प्रकरण एसआयटीकडे पाठवण्यास नकार दिला आहे. आपल्या निर्णयात, न्यायालयाने उर्वरित दोन तपासांसाठी सेबी म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला तीन आठवड्यांच्या सूचना दिल्या आहेत. या अगोदर सेबीने 22 तपास पूर्ण केले आहेत.
अदानी -हिंडनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. ज्यावर आज (बुधवार, ३ जानेवारी) सुनावणी पार पडली. देशात आणि भारतीय शेअर बाजारात खळबळ उडवून देणाऱ्या अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात कोणत्याही एसआयटी चौकशीची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हणले आहे.
अदानी समूहाच्या संदर्भात आलेल्या हिंडबर्ग रिपोर्टच्या आधारावर कोर्टामध्ये अनेक याचिका दाखल केल्या होत्या, ज्यामध्ये या प्रकरणाची एसआयटी कडून चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निकालाने अदानी समुहाला मोठा दिलासा मिळाला आहे.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर बाजारात लिस्ट असलेल्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.