अर्थव्यवस्थेला चालना अन् चीनला दणका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात!
अर्थव्यवस्थेला चालना अन् चीनला दणका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात!
img
Dipali Ghadwaje
जपानमधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक टीडीके कॉर्पोरेशन भारतात येत आहे. ही कंपनी Apple Inc ची जागतिक लिथियम आयर्न बॅटरी पुरवठादार आहे. TDK भारतात Apple च्या iPhone साठी बॅटरी सेल तयार करेल. त्यामुळे चीनसाठी मात्र हा सर्वात मोठा धक्का आहे.कारण, चीनच्या चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या कंपन्यांनी चीनकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच परदेशी कंपन्या चीनला पर्याय म्हणून भारताचा विचार करत आहेत. आता नामांकीत जपानी कंपनेनंही भारतात आपला व्यापार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत जगात अव्वल मानली जाणारी जपानची सर्वात मोठी कंपनीही याला अपवाद नाही. जपानची ही  नामांकीत कंपनी आता लवकरच भारतात येत आहे. ही कंपनी भारतात Apple च्या लिथियम आयर्न बॅटरीसाठी सेल असेंबलर सनवोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पुरवठा करेल. सध्या देशात फक्त सनवोडा इलेक्ट्रॉनिक्स लिथियम आयर्न बॅटरी सेलचा पुरवठा करते. सनवोडा जगभरातील विविध बाजारपेठांमधून बॅटरी आयात करते.

हरियाणामध्ये खरेदी केलीय 180 एकर जमीन 
TDK भारतातील लिथियम आयर्न बॅटरी सेल तयार करण्यासाठी हरियाणातील मानेसर येथे एक प्लांट उभारणार आहे. त्यासाठी त्यांनी हरियाणामध्ये 180 एकर जमीन खरेदी केली आहे. Apple ला पुरवठा करण्यासाठी TDK लवकरच बॅटरी सेलचं उत्पादन सुरू करणार आहे. याशिवाय भारतासाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, या प्लांटमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशात नोकरीच्या संधी वाढतील आणि आयटी व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होईल. TDK च्या ॲपल सेलच्या भारतात उत्पादनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. विदेशी रेटिंग एजन्सींनी आगामी काळात भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group