भारतातील आघाडीची टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी रिलायन्स जिओने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. कंपनीने टीव्हीसाठी एक अॅप आणलं आहे. या अॅपमुळे डीटीएच कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. कंपनीने जिओ टीव्ही+ अॅप आणलंय. हे अॅप आधी जिओच्या सेट टॉप बॉक्सपर्यंत मर्यादित होतं. ते जिओ फायबर व जिओ एअर फायबर कनेक्शनसोबत यायचं. आता ते अँड्रॉइड टीव्ही, अॅपल टीव्ही व अॅमेझॉन फायर ओएस असलेल्या टीव्हीतही इन्स्टॉल करता येईल.
800 हून जास्त डिजिटल टीव्ही चॅनेल्स
कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना या अॅपमध्ये 800 हून अधिक डिजिटल टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस मिळेल. त्यात न्यूज, एंटरटेन्मेंट, स्पोर्ट्स, म्युझिक, बिझनेस यांसह अनेक कॅटेगरीजमध्ये 10हून अधिक भाषांमध्ये आणि 20 स्टाइलमध्ये उपलब्ध असतील. जिओ फायबर व जिओ एअरफायबरचे युझर्स यात 13+ सर्व्हिस, उदा. जिओ सिनेमा प्रिमियम, डिस्ने प्लस हॉटस्टार, झी 5, सोनी LIV, होइचोई, सन NXT, डिस्कव्हरी+, फॅनकोड, लायन्सगेट प्ले, शेमारू मी, ईटीव्ही विन, इरॉस नाऊ, अल्ट बालाजी यांचा कंटेंट स्ट्रीम करू शकतात
सिंगल साइन-इनवर मिळेल फुल एंटरटेन्मेंट
जिओ टीव्ही + कंटेंटपर्यंत पोहोचण्यासाठी सिंगल साइन-इनवर काम करेल. हा स्मार्ट टीव्ही रिमोट कम्पॅटिबिलिटी, कंटेंटसाठी स्मार्ट फिल्टर व चॅनेल्स, तसंच प्रोग्राम शोधण्यासाठी स्मार्ट गाइडही ऑफर करेल. तसंच युझर्स ऑन-डिमांड कंटेंटचा प्लेबॅक स्पीड कंट्रोल करू शकतात. जिओ टीव्ही+ अॅपमध्ये ‘किड्स सेफ’ झोनही देण्यात आला आहे.
या प्लॅन्समध्ये चालेल जिओ टीव्ही +
जिओ+ अॅप अँड्रॉइड टीव्ही, अॅपल टीव्ही आणि अॅमेझॉन फायर टीव्ही या प्लॅटफॉर्मवर अधिकृत अॅप स्टोअरवर उपलब्ध होईल. एलजी टीव्हीसाठी सपोर्ट लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही तुमच्या जिओ फायबर किंवा जिओ एअर फायबरशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाकून जिओ टीव्ही+ चा आनंद घेऊ शकता. मात्र हा अनुभव फक्त एअर फायबर व जिओ फायबरच्या मोजक्या प्लॅन्सपुरता मर्यादित आहे; पण फक्त जिओ एअर फायबर, जिओ फायबर प्रीपेड 999 रुपये आणि त्याहून जास्तीचे प्लॅन्स, तसंच जिओ फायबर पोस्टपेड 599 रुपये, 899 रुपये आणि त्याहून अधिकचे प्लॅन नवीन अॅप अॅक्सेस करू शकतं.