अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नागरिकेतवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर स्थगिती दिली आहे.
आता या प्रकरणी पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे. यूएस कोर्ट डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय संवैधानिक आहे किंवा नाही याचा निर्णय आताच घेणार नाही.
दरम्यान, याआधी वॉशिंग्टनचे जिल्हा न्यायाधीश जॉन कॉफनर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बर्थ राइट आदेशाच्या अंमलबाजवणीवर स्थगिती आणली होती. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही या आदेशाला स्थगिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
तीन न्यायाधीशांनी वेगवेगळ्या निर्णयांत ट्रम्प यांच्या नागरिकता आदेश स्थगिती दिली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयात अमेरिकेत जन्मलेल्या मुलांची नागरिकता संपुष्टात आणण्याची तरतूद करण्यात आली होती. या निर्णयाला सुरुवातीपासूनच मोठा विरोध केला जात होता. ट्रम्प प्रशासनाचा हा आदेश 14 व्या संशोधनाचे उल्लंघन असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
मागील महिन्यात ट्र्म्प सरकारने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. यात म्हटले होते की मनाई आदेश काढून टाकावेत किंवा कमी तरी करावेत. खालच्या न्यायालयांना इतका मोठा निर्णय घेण्याचे अधिकार नसावेत असेही ट्रम्प सरकारने या याचिकेत म्हटले होते.
आता या प्रकरणात पुढील सुनावणी 15 मे रोजी होणार आहे. संपू्र्ण देशात लागू होणारे आदेश देण्याचा अधिकार जिल्हा न्यायाधीशांना आहे की नाही यावर सुनावणी होणार आहे.
जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या अधिकारापेक्षा जास्तीचे आदेश दिले आहेत हा तर्क जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तर ट्रम्प प्रशासनाला देशाच्या काही भागांत नागरिकेतसंबंधी धोरण लागू करण्याची परवानगी मिळू शकते.