एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला भीषण आग
एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला भीषण आग
img
DB
सोलापूर : सोलापूर येथे  टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर अग्निशामक विभाग घटनास्थळी दाखल झाला असून आग विझविण्याचे त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत १५ गाड्या (बंब) पाणी मारले आहे, पण आग आटोक्यात आलेली नाही. कारखान्यात टॉवेल व कच्चा माल असल्याने आगीचा भडका कायम असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. बघ्यांची मोठी गर्दी त्याठिकाणी जमली आहे. ही आग पसरणार नाही, याची खबरदारी अग्निशामक विभागाकडून घेतली जात आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group