धक्कादायक!  महिला कंडक्टर आणि प्रवाशांची मारामारी! वाचा कुठे घडली ही घटना ?
धक्कादायक! महिला कंडक्टर आणि प्रवाशांची मारामारी! वाचा कुठे घडली ही घटना ?
img
Jayshri Rajesh
मुंबई लोकलच्या गर्दीमध्ये महिला प्रवाशांमध्ये होणारी बाचाबाची आणि मारामारी आता काही नवीन नाही. त्यात छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकातून मात्र विचित्र घटना समोर आली आहे. थेट महिला कंडक्टरने एका पुरुष प्रवाशाला कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये मारामारी जुंपली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धुळे-सोलापूर रस्त्यावर पाचोड बस स्थानक आहे. हे बसस्थानक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्वाचं मानलं जातं. रोज या ठिकाणावरून दोनशे ते जवळपास अडीचशे प्रवासी ये-जा करतात. पाचोड बस स्थानकावर सर्वच बस थांबा घेतात. मात्र काही कंडक्टर मुजोरी करतात. पाचोड येथील काही विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी ‘आडूळ’ थांबा घेतला जात नाही. 

अजय डुकळे या प्रवाशांने पाचोड येथून आडुळ वरती प्रवासी घेण्यास विनंती केली होती. परंतु महिला बस वाहकाने नकार दिला. त्यामुळे प्रवासी आणि बस कडंक्टरमध्ये बाचाबाची झाली. या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं.शाळेतील मुलींना बसमध्ये घेण्याची विनंती प्रवाशांनी केली होती. परंतु यास महिला कंडक्टरने नकार दिल्याने हा धक्कादायक प्रकार घडला.

सुरूवातीला प्रवासी आणि कंडक्टर महिलेमध्ये शा‍ब्दिक वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या कंडक्टर महिलेने थेट प्रवाशाच्या कानशि‍लात लगावली. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. या घटनेप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group