राज्यात एकीकडे ट्रक चालकांचा संप तर दुसरीकडे आता लालपरीचा मोठा निर्णय
राज्यात एकीकडे ट्रक चालकांचा संप तर दुसरीकडे आता लालपरीचा मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
नांदेड : हिट अँड रन कायद्याला देशासहित राज्यातही विरोध पाहायला मिळत आहे. राज्यभरातील हजारो ट्रक चालक संपावर गेले आहेत. इंधन पुरवठा करणारे ट्रक चालक देखील संपावर गेले आहेत. यामुळे काही ठिकाणी पेट्रोल पंपावरही इंधनाचा तुटवडा पाहायला मिळत आहे. या संपामुळे जीवनाश्यक वस्तूवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान या संपाचा फटका एसटी वाहतुकीवरही बसण्याची शक्यता आहे. मात्र लालपरी या संपातही दहा दिवस तग धरू शकेल इतका इंधनसाठा उपलब्ध आहे. 

नांदेडच्या आगारात 45 हजार लिटर डिझेल उपलब्ध असून त्याद्वारे आगामी दहा दिवस एसटीची नियोजित वाहतूक सुरळीत धावू शकते असे आगार प्रमुखानी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले. 

एसटी बससाठी लागणारे डिझेल सध्या ऑईल कंपन्यांच्या डेपोमधून मिळत नसल्यामुळे पोलीस सुरक्षेमध्ये तो डिझेल एसटीच्या विविध डेपोपर्यंत आणण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी एसटी प्रशासनानं पोलीस स्टेशनला पत्र दिल्याची माहिती एसटीचे विदर्भ उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिली आहे. एसटी बसेस साठी विदर्भात रोज दोन लाख लिटर डिझेल लागते. 

सध्या विदर्भातील सर्व डेपो मिळून साडे सहा लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. त्यामुळे तीन दिवस एसटी सुरळीत धावू शकेल अशी स्थिती असल्याचे गभने म्हणाले. मात्र, नागपूर जिल्ह्यात एक दिवस पुरेल एवढंच डिझेल साठा असल्याने नागपुरातून दुसऱ्या जिल्ह्यात धावणाऱ्या एसटींना तिथून डिझेल भरून येण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 
 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group