लालपरीचा प्रवास महागला! महिलांना 50 टक्के सवलत मिळणार की नाही?
लालपरीचा प्रवास महागला! महिलांना 50 टक्के सवलत मिळणार की नाही? "ही" माहिती आली समोर
img
DB
राज्यात 24 जानेवारीपासून जवळपास 15 टक्क्यांनी एसटी प्रवास महागला आहे. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिलांना एसटी बस प्रवासात महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 50 टक्के सवलतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
 
परिवहन मंत्री काय म्हणाले?

“राज्याचे प्रधान सचिव संजय सेठी यांच्याशी चर्चा केली. गुरुवारी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या माध्यमातून परिवहन विभागाचे प्रमुख आणि एडीजी यांच्यात प्राधिनिकरणाची बैठक झाली. त्या बैठकीत एसटीच्या रखडलेल्या भाडेवाढीबाबत निर्णय घेतला. त्यानुसार बैठकीत 14.95 टक्क्यांनी एसटी तिकीट दरात भाडेवाढ केली. तसेच 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. मात्र याबाबत माझ्याकडे अधिकृतरित्या याबाबतची फाईल माझ्याकडे आलेली नाही, मात्र ती येईल असं मला वाटतंय “, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

“एसटीची भाडेवाढ दरवर्षी करणं गरजेचं आहे. प्रवाशांना सुखसोयी देत असताना डीझेल-सीएनजीचा दर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. एसटी महामंडळाची परिस्थितीत बघितली तर दरदिवशी सुमारे 3 तर दर महिन्याला 90 कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे”, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान  “आमच्या सरकारने ज्या जुन्या सवलती आणि योजना सुरु केल्या आहेत, त्यामध्ये कुठेही कटोती होणार नाही. सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50 टक्के सूट ही कायम राहिल. या सवलतीमुळेच एसटीचं उत्पन्न वाढलं आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेत कटोती होणार नाही”, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं.
 
इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group