दिवाळी तोंडावर असताना ‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की नाही? समोर आली महत्वाची माहिती
दिवाळी तोंडावर असताना ‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की नाही? समोर आली महत्वाची माहिती
img
Dipali Ghadwaje
देशासह राज्यात २८ ऑक्टोबरपासून सर्वत्र दिवाळी या सणाला सुरूवात होणार आहे. दिवाळी सणाच्या पूर्वीच रेल्वे प्रशासन, महानगर पालिका, किंवा काही खासगी कार्यालयात आपापल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट किंवा बोनस स्वरूपात काही रक्कम जाहीर करण्यात येते. काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर देखील करण्यात आला आहे. 

असे असताना राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचारी मात्र आजही दिवाळी भेट, बोनसच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या दिवाळी बोनसमध्ये काहीअंशी वाढ करून कर्मचाऱ्यांना ६ हजार रूपयांची दिवाळी भेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

यंदा दिवाळी २८ ऑक्टोबरला आल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा दरमहिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान होतो. मात्र त्यापूर्वी येणाऱ्या दिवाळीत आर्थिक खर्च, सणांसाठीची खरेदी कशी करायची असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर आहे. 

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी ५५ कोटींचा निधी तातडीने द्या, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला असताना एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बोनसचे ६ हजार रूपये मिळाले नसल्याचेही एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.
 
ST bus |
इतर बातम्या
Join Whatsapp Group