मुंबई : गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील वीर रेल्वे स्टेशनजवळ स्कॉर्पिओला टोइंग व्हॅनने जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू तर झाला आहे तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारकरिता दाखल करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गावरिल वीर रेल्वे स्टेशनजवळ आज पहाटे. भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर महाड, साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर दोघेही राहणार कुंभारआळी महाड आणि समीर मिंडे (35) राहणार दासगाव महाड या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर उर्वरित दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
स्कॉर्पिओमधील डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ वाहन चालकाने रस्त्याच्या बाजूला उभी केली असता भरधाव वेगात चिपळूणहून पनवेलकडे दिशेकडे जाणाऱ्या टोईंग व्हॅन क्रमांक MH14CM 309 ने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. यामुळं ही दुर्घटना घडली.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी टोइंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या अपघातात जे दोन जण जखमी झाले आहेत, त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारकरिता दाखल करण्यात आले आहे.