मोठी दुर्घटना टळली !
मोठी दुर्घटना टळली ! "एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या आल्या अन् जोरदार..... " , व्हिडीओ होतोय व्हायरल
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यात मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. येथे एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या आल्या अन् जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की इंजिन रेल्वे रूळावरून खाली कोसळले. या अपघातामध्ये चालक आणि को पायलट गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , दोन मालगाड्या एकाच पटरीवर आल्यामुळे हा भीषण अपघात झाला. सध्या रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेचे कारण तपासले जात आहे. हा अपघात फतेहपूर जिल्ह्यातील खगा कोटवाली येथील पँबपिपूरजवळ झाला. अपघातानंतर दोन मालगाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

नेमकं काय घडलं?

एक मालगाडी सिग्नलला थांबली होती. त्यावेळी दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. पण एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या कशा आल्या? हा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. अपघातानंतर पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

अपघाताची माहिती माहिती मिळताच रेल्वे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गाड्यांचे लोको पायलट जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे.

अपघातामुळे फ्रेट कॉरिडॉरवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समजतेय. अनेक मालवाहतूक गाड्या थांबविल्या गेल्या आहेत. काहींचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group