मथुरामध्ये भीषण ट्रेन अपघात;  ट्रेन आली, प्लॅटफॉर्मवर थांबली अन्...... नेमकं घडलं काय?
मथुरामध्ये भीषण ट्रेन अपघात; ट्रेन आली, प्लॅटफॉर्मवर थांबली अन्...... नेमकं घडलं काय?
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये एक दुर्घटना घडलीये. शकूर बस्ती येथून येणाऱ्या ईएमयू ट्रेनला मथुरा जंक्शनवर अपघात झाला. ही ट्रेन अचानक रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर चढली. सुदैवाची बाब म्हणजे, हा अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये प्रवासी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवीतहानी टळली आहे. अपघातानंतर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला, लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. काही काळासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भितीचं वारावरण निर्माण झालं होतं. 

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या अपघाताचा तपास केला जात आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शनवर रात्री उशिरा रेल्वे अपघात झाला. शकूर बस्तीकडून येणारी एक ईएमयू गाडी थेट मथुरा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर चढली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळत आहे. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सर्व प्रवासी आधीच ट्रेनमधून उतरले होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ही गाडी शकूर बस्ती येथून आली असल्याचं त्यांनी सांगितलं. 10:49 ला ट्रेन आली. त्यावेळी सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचं काम सुरू असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन हटवल्यानंतर अप मार्गावरील गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

नेमकं घडलं काय? 
मिळालेल्या माहितीनुसार, ईएमयू ट्रेन शकूर बस्ती येथून येत होती. रात्री जवळपास 10.49 वाजता ट्रेन मथुरा जंक्शनवर पोहोचली, ज्यानंतर ट्रेनमधील सर्वच्या सर्व प्रवासी उतरले. ट्रेन सुरू झाली आणि थेट ट्रॅकवरुन खाली उतरुन प्लॅटफॉर्मवर चढली. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये पाहायला मिळतंय की, ट्रेनचं इंजिन प्लॅटफॉर्मवर चढलेलं आहे, ज्यामुळे प्लॅटफॉर्म तुटला असून ट्रेनचा पुढचा भागही काही प्रमाणात प्रभावित झाल्याचं दिसून आलं आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group