नवरा निघाला नपुंसक, दिराच्या वागणुकीने मग नवविवाहिता हैराण,केले असे की...
नवरा निघाला नपुंसक, दिराच्या वागणुकीने मग नवविवाहिता हैराण,केले असे की...
img
दैनिक भ्रमर
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवविविवहितेला असे काही समजले की पहिल्याच दिवशी तिची सारे स्वप्ने भंग झाली. त्यामुळे या नवविवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. सुहागरात्रीच्या दिवशीच पती अशा काही गोष्टी करू लागला की तो नपुंसक असल्याचे तिच्या लक्षात आल. सुहागरात्रीची स्वप्ने रंगविली होती, परंतू पतीचे खरे समोर आल्याने तिला मोठा धक्का बसला. एवढेच नाही तर नंतर दिराने मग अश्लिल गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप तिने केला आहे. 

विवाहितेचे आरोप काय ? 

रावतपूरच्या तरुणीचे लग्न गेल्या वर्षी मार्चमध्ये उन्नावच्या बांगरमऊच्या तरुणाशी झाले होते. तिला या वर्षीच्या मार्चमध्ये घरातून हाकलण्यात आले. सासऱ्याने तिच्याकडील सर्व दागिने काढून घेतले आहेत. मोठी जाऊ आणि दिराने मारहाण केली आहे. दिराने शरीरसुख घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे आरोप तिने केले आहेत.  

पती नपुंसक असल्याचे तिने दुसऱ्याच दिवशी आपल्या थोरल्या जावेला सांगितले होते. तिने नवविवाहितेला गप्प राहण्यास सांगितले. काही दिवसांनी मोठा दीर आला आणि त्याने नवविवाहितेशी लगट करत, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुरु केला. याविरोधात तिने जावेला सांगताच ती जावच तिच्यावर उलटली आणि तिच्यावरच आरोप करू लागली. यात नवविवाहितेला दीर आणि जावेने शिवीगाळ करत मारहाण केली. 

यानंतर या नवविवाहितेला त्रास देण्यास सुरुवात झाली. यामुळे कंटाळून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सासरचे लोक तिला घरातून हाकलून देण्यासाठी प्रयत्न करत होते, तसेच माहेरहून दोन लाख रुपये मागत होते, असा आरोप तिने केला आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group