'बाबांनी आईला जिवंत जाळलं' म्हणत लेकराचा आक्रोश; निक्की केसमध्ये काय घडलं ?
'बाबांनी आईला जिवंत जाळलं' म्हणत लेकराचा आक्रोश; निक्की केसमध्ये काय घडलं ?
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे हुंड्यासाठी एका विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिरसा गावातील निक्की नामक महिलेला हुंड्याच्या मागणीसाठी मारहाण करून नंतर जाळून मारण्यात आले. निक्कीचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये विपिनसोबत झाला होता. निक्कीला तिच्या घरात मारहाण करून जाळण्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्यावरील क्रूरता स्पष्टपणे दिसते. 

या घटनेनंतर निक्कीच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो "पप्पांनी आईला लायटरने जाळले" असे म्हणताना दिसत आहे, ज्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. 

निकीच्या कुटुंबानी असा आरोप लावला की, तिचा पती विपिनने तिला जाणूनबुजून जिवंत जाळले. निक्की आणि विपिनचे 2016 साली लग्न झाले होते, त्यानंतर सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी तिचा सतत छळ केला जात होता. सासरच्यांनी प्रथम स्कॉर्पिओ कार आणि नंतर बुलेटची मागणी केली, जी निकीच्या कुटुंबानेही पूर्ण केली. मात्र त्यानंतर आरोपीच्या कुटुंबाचा लोभ आणखी वाढल्याचा आरोप आहे. त्यांनी निकीच्या कुटुंबाकडून थोडेथोडके नव्हे ३६ लाख रुपयांची मागणी केली. मात्र हे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर निक्कीचा पती तिचा छळ करू लागला आणि त्याने तिचा जीव घेण्याचा भयानक कट रचला.

हे ही वाचा 
संतापजनक ! हातपाय नदीत फेकले, धड घरात ठेवलं; प्रेम विवाहाचा भीषण अंत, नेमकं काय घडलं ?

निक्कीची बहीण कांचन हिने सांगितले की, २१ ऑगस्ट रोजी निक्कीचा पती विपिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केली.त्यानंतर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जाळले. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला सुरुवातीला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथून तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, पण वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला.

हे ही वाचा 
आता ड्रीम-11 नाही... आशिया चषकात टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नवीन नाव, कारण...

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामध्ये आरोपी पती विपिन भाटी आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला निक्कीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. यानंतर, आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये निक्की जळालेली होती आणि ती पायऱ्यांवरून खाली पडताना दिसली. आरोपी पती विपिनसोबत दिसलेली आणि निक्कीला मारहाण करणारी स्त्री म्हणजे तिची सासू, विपिनची आई दयावती आहे. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आणि निक्कीच्या बहिणी आणि मुलाने केलेल्या आरोपांनंतर, ग्रेटर नोएडा पोलिसांनी शनिवारी आरोपी पती विपिन भाटीला अटक केली. निक्कीच्या मृत्यूपासूनच सासू दयावती फरार होती, अखेर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group