भीषण अपघात : एक चूक पडली महागात , एकाच दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू
भीषण अपघात : एक चूक पडली महागात , एकाच दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
डहाणू येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला.  ट्रक्सी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली, त्यामध्ये दुचाकीवरील तीन जणांचा मृत्यू झाला. टॅक्सीमधील महिला जखमी झाली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. त्या तिन्ही युवकांनी हेल्मेट घातलं नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

अपघात झाल्यानंतर तिघांच्या डोक्याला जबर मार लागला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. हेल्मेट डोक्यावर असते तर कदाचीत जीव वाचला असता, अशी चर्चा पालघरमध्ये सुरू आहे. 

डहाणू तालुक्यातील कासा सायवन रोडवर वाघाडी गावाजवळ  झालेल्या या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एका इको कार आणि भरधाव बाईकची धडक होऊन कार पलटी झाली.

वाघाडी येथील गेल इंडिया कंपनीसमोर भरधाव बाईकने समोरून येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बाईकवरील तिघे तरुण जागीच ठार झाले. मृतांमध्ये राहुल हरके (वय 20), चिन्मय चौरे (वय 19) आणि मुकेश वावरे (वय 20) यांचा समावेश आहे. तिघेही कासा चारोटी परिसरातील रहिवासी होते.

भीषण धडकेमुळे इको कार जागीच पलटी झाली असून, गाडीचा समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तसेच बाईक देखील पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. बाईकवरील तिघांच्या डोक्याला व पायांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. इको कारमधील रीना मोरे नावाची महिला गंभीर जखमी झाली असून, तिला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन युवकांचा अपघाती मृत्यू कुटुंबीयांसाठी आणि स्थानिकांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group