मालगाडीचे डबे घसरल्याने वेस्टर्नच्या प्रवाशांना फटका, ‘या’ गाड्याही झाल्या रद्द
मालगाडीचे डबे घसरल्याने वेस्टर्नच्या प्रवाशांना फटका, ‘या’ गाड्याही झाल्या रद्द
img
Dipali Ghadwaje
पालघर स्थानकाजवळ मालगाडी घसरून भीषण अपघात झाला आहे. या अपघाताला आता 15 तास उलटले असले तरीही वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. याचा परिणाम लोकल सेवेवेर देखील झाला असून विरार ते डहाणू या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

रुळांवर पडलेले मालगाडीचे डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र ते पूर्णपणे हटवेपर्यंत लोकल सवा तसेच लांब पल्ल्यांट्या गाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत असून अनेक गाड्यांना उशीर होत आहे.

काल रात्रीपासूनच पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू असलेला गोंधळ आज सकाळी देखील कायम असून त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत. कामावर निघालेले अनेक चाकरमानी, विद्यार्थी यांना मोठा फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्याही १०-१२ तास उशिराने सुटत आहेत.

या मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीचे काही डबे काल संध्याकाळी रुळांवरून घसरले आणि एकच गोंधळ निर्माण झाला. पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी पोहचत असताना क्रॉसिंगलाच मालगाडीचे पाहिले चाक ट्रक वरून खाली घसरले. सर्वात पाठीमागील चाक ट्रेकवरून खाली घसरले असताना याचा फटका समोरच्या चाकांना बसून, त्यावर लोड आल्याने मध्यभागाचे 7 डब्बे हे रुळावरून खाली घसरले. ऐन गर्दीच्या वेळेस वाहतूक ठप्प झाल्याने काल प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आणि सकाळीही वाहतूक अजून सुरळीत न झाल्याने लोकांना आणखीनच मनस्ताप सहन करावा लागतोय. वाढत्या गर्दीमुळेही लोकांना त्रास होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group