नाशिकरोड (प्रतिनिधी):- कसारा घाटात मालगाडीचे डबे घसरल्याने अपघात झाला. यामुळे मुंबई येथून नाशिकरोड कडे गाडयांचा खोळंबा झाला असुन अनेक गाड्या उशिराने धावत आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास मुंबई वरून भुसावळ कडे जाणाऱ्या मालगाडी चे चार ते पाच डबे कसारा घाटात रेल्वे रूळच्या खाली उतरले आणि अपघात झाला. या मुळे मुंबई वरून भुसावळ कडे जाणाऱ्या गाडयांचा खोळंबा झाला.
या अपघातामुळे मुंबई कडून येणारी चाकरमान्यांची गाडी म्हणून ओळख असलेली पंचवटी एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, कलकत्ताला जाणारी हावडा मेल, मुंबई अमरावती एक्सप्रेस, पंजाब एक्सप्रेस सह अनेक गाड्या चार ते पाच तासांनी उशिराने धावतील. या गाड्या मधील नाशिक आणि येथून जवळ असलेल्या नागरिकांनी कसारा रेल्वे स्थानकातून खाजगी वाहनाने प्रवास सुरु केला आहे.
त्यामुळे खाजगी वाहन धारकांनी नेहमी च्या दरापेक्षा अधिक भाडे वाढ केल्याचे काही प्रवास्यांनी सांगितले. सकाळ पर्यंत गाड्या सुरळीत होतील असे रेल्वे प्रसाशाने कळवले आहे.