कसारा घाटात रेल्वे लाइनवर दरड कोसळली; मोठा अनर्थ टळला
कसारा घाटात रेल्वे लाइनवर दरड कोसळली; मोठा अनर्थ टळला
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- इगतपुरी भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इगतपुरी घाटात रेल्वे लाइनवर दरड कोसल्याने अनेक रेल्वे गाड्या प्रभावीत झाल्या आहे. पंचवटी एक्सप्रेस पास झाल्यानंतर काही वेळात हा प्रकार घडल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

इगतपुरी भागात मोठया प्रमाणात पाऊस सुरु आहे. रस्ते खराब झाल्याने व अनेक ठिकाणी पाणी सचल्याने नाशिकवरून मुबंईला जाण्यासाठी सुमारे सात ते आठ तासाचा कालावधी लागत असल्याने प्रवासी रेल्वेचा आधार घेत मुबंई गाठत आहे. मात्र आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे इगतपुरी हद्दीतील कसारा घाटात किलोमीटर पोल नंबर 129/9 ते 130/1 या भागात दरड कोसळली.

ही दरड कोसळण्यापूर्वी काही वेळे अगोदर मनमाड-मुबंई पंचवटी एक्सप्रेस या ठिकाणावरून निघून गेली होती. त्यामुळे मोठा अपघात टळला.
दरड कोसळताच रेल्वेच्या कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे रुळावर पडलेली मोठ मोठे दगड माती काढण्याचे काम सुरु केले. ज्या भागातून दगड माती पडली त्या भागच्या आसपास मोकळे झालेले दगड काढून घेण्याचे काम सुरु आहे.

घटना घडल्या नंतर मुबंई कडे जाणाऱ्या काही गाड्या मनमाड, नाशिकरोड, देवळाली, लहवीत स्थानकावर थांबविण्यात आल्या होत्या.
घाट क्षेत्रात तीन रेल्वे ट्रॅक असल्याने पर्यायी रेल्वे ट्रॅक वरून गाड्या हळुवार सोडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मुबंई कडे जाणाऱ्या अनेक गाड्या तास, दोन तास उशिराने धावत आहे. या घटनेने रेल्वे अधिकारी, कर्मचारी सतर्क झाले असून दरड काढण्याचे काम युद्ध्यपातळीवर सुरु आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group