खळबळजनक घटना : चालत्या रेल्वेमध्ये युवतीवर अत्याचार
खळबळजनक घटना : चालत्या रेल्वेमध्ये युवतीवर अत्याचार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भुसावळ ते सुरतदरम्यान एका चालत्या रेल्वेच्या शौचालयात अज्ञात तरुणाने एका युवतीवर अत्याचार केला; मात्र ही घटना पाच महिन्यांनंतर उघडकीस आली असून, या प्रकरणी तिच्या पालकांनी भुसावळ रेल्वे पोलिसांकडे गुन्हा नोंदविला आहे; मात्र यावेळी संबंधित युवती व पालक भुसावळहून सुरतकडे जात असल्याने भुसावळ रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा नाशिकला गंगापूर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

याबाबत माहिती अशी, की गेल्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित युवतीचे पालक हे मुलीसह नाशिकहून सुरत येथे जाण्यासाठी नाशिकहून भुसावळला एस. टी. बसने गेले व भुसावळ ते सुरत हा प्रवास रेल्वेने केला. रेल्वे सुरू होत नाही, तोच सुमारे दहा मिनिटांनी ही युवती शौचालयात गेली असता अज्ञात युवकांनी शौचालयात घुसून या युवतीवर अत्याचार केला. यातून संबंधित युवती गर्भवती राहिली; मात्र त्यावेळी तिला ते समजून आले नव्हते.

दरम्यान, गेल्या ऑगस्टमध्ये हे कुटुंब पुन्हा सुरत येथे जात असताना या युवतीच्या पोटात त्रास सुरू झाला. त्यामुळे तिला सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. याबाबत तिच्या पालकांनी युवतीला जाब विचारला असता या युवतीने गेल्या एप्रिलमध्ये घडलेला प्रसंग सांगितला.

या प्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, हा गुन्हा आता नाशिकला गंगापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुमडे व सहकारी करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group