कसारा घाटात पंचवटी एक्स्प्रेसची कप्लिंग तुटली; प्रवाशांची धावपळ
कसारा घाटात पंचवटी एक्स्प्रेसची कप्लिंग तुटली; प्रवाशांची धावपळ
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसला कसारा घाटात अपघात झाला. सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही.

याबाबत माहिती अशी, की आज सकाळी पंचवटी एक्स्प्रेस नाशिकरोडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. देवळाली कॅम्प, इगतपुरीनंतर कसारा घाट सोडल्यानंतर पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनला लागून असलेल्या एका डब्याचे कपलिंग तुटल्याने अपघात झाला.

त्यामुळे इंजिनसह एक डबा पुढे गेला, तर मागे असलेले डबे जागच्या जागी थांबले. आज सकाळी पंचवटी एक्स्प्रेसने कसारा घाट सोडल्यानंतर सकाळी 8.40 च्या सुमारास इंजिन व त्याला लागून असलेला सी-2 हा डबा पोल नंबर 119/46 जवळ कपलिंग तुटल्यामुळे इंजिनसह पुढे गेला व इतर डबे तसेच मागे राहिले. एखाद्या रेल्वेचे कपलिंग तुटल्यानंतर तत्काळ ब्रेक लागतो आणि गाडी थांबण्याची व्यवस्था असल्याने पंचवटी एक्स्प्रेसचे इतर डबे सुदैवाने पुढे गेले नाहीत. हा अपघात कसारा घाटात झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती; मात्र दैव बलवत्तर म्हणून ही घटना टळली.

या अपघाताची माहिती मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी रेल्वेचे पथक पाठवून पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग व्यवस्थित करून ही गाडी 9 वाजून 35 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना केली.

इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group