मोठी दुर्घटना; धावत्या ट्रेनने घेतला पेट, प्रवाशांची पळापळ
मोठी दुर्घटना; धावत्या ट्रेनने घेतला पेट, प्रवाशांची पळापळ
img
Dipali Ghadwaje
गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. वलसाडच्या छिपवाड येथे हमसफर एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. जनरेटर असलेल्या डब्ब्याला आग लागली आहे. आग लागल्याने घटनास्थळी प्रवाशांमध्ये मोठी पळापळ सुरू झाली. 

दरम्यान जनरेटर असलेल्या ट्रेनच्या डब्ब्याला आग लागल्यावर प्रवाशांनी भरलेल्या डब्ब्याकडे आग वळू लागली. त्यामुळे जनरेटर असलेला डब्बा वेगळा करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group