चेन्नई : गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या कोइम्बतून येथे ही घटना घडली आहे.
तामिळनाडूमध्ये एका चार महिन्यांची गर्भवती महिलेसोबत दोन पुरुषांनी लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकलं . दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पिडीत महिला आंध्र प्रदेशातील चित्तूरला जात असताना शुक्रवारी पहाटे तामिळनाडूतील जोलारपेट्टई परिसरात ही घटना घडली. महिला वॉशरूमसाठी गेली असता दोन पुरुषांनी तिच्यावर हल्ला केला आणि लैंगिक अत्याचार केला. मदतीसाठी ओरडत ती वॉशरूमकडे धावत असताना आरोपींनी तिला पाठलाग करून थेट वेल्लोर जिल्ह्यातील कोयंबटूर-तिरुपती इंटरसिटी एक्स्प्रेसमधून फेकून दिले.
या घटनेत महिलेच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, डोक्याला देखील जबर मार लागला आहे. तिला तत्काळ वेल्लोर जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित महिला कोयंबटूरमधील एका कपड्यांच्या कंपनीत काम करत होती.
जोलारपेट्टई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून रेल्वे संरक्षण दलआरोपींचा शोध घेत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी हेमराज नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.