झारखंडमधील जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाची एक टीम दाखल झाली आहे. बचावकार्य सुरु आहे. ही घटना करमाटांड जवळ कालाझरिया येथे घडली आहे.
एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्यानंतर प्रवाशांना याबाबतची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे लोक रेल्वेमधून बाहेर उड्या टाकू लागले. याचवेळी समोरुन येणाऱ्या झाझा-आसनसोल रेल्वेने ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशांना चिरडले.
याच लाईनवरुन बंगळुरू-यशवंतपूर एक्सप्रेस जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, लाईनच्या बाजूला टाकलेल्या गिट्टीची धूळ उडत होती. मात्र धूळ पाहून गाडीला आग लागल्याचे आणि धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.
त्यामुळे प्रवाशीही ट्रेनमधून लगेच उतरले. त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्गावर जाणाऱ्या ट्रेनची धडक बसून अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.