पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला. येथे रुळावरउभ्या असलेल्या कांचनजंगा एक्सप्रेसला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली.या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
एनजेपीहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला सिलीगुडी ओलांडल्यानंतर रंगपनीर स्टेशनजवळअपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचेगीं चेमोठे नुकसान झाले.
या अपघातात आतापर्यंत 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मालगाडीच्या लोको पायलटचाही मृत्यू झाला आहे. रेल्वे चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे बोललेलं जात आहे.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन प्रवासी बोगी आणि एका पार्सल बोगीचे नुकसान झालेआहे. या अपघातात अनेक जण जखमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळावरील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60जण जखमी झाले आहेत.'' तत्पूर्वी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सांगितले की, "हा दुर्दैवी अपघात ईशान्य फ्रंटियर रेल्वे झोनमध्ये झाला. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल समन्वयाने काम करत आहेत. जखमींना मीं रुग्णालयात नेण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.'
उत्तर सीमा रेल्वेच्या कटिहार विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) म्हणाले की, 13174 कांचनजंगा एक्सप्रेस आगरतळाहून सियालदहला जात असताना सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाला.