हावडा-मुंबई एक्स्प्रेसच्या ५ बोगी घसरल्या, दोघांचा मृत्यू
हावडा-मुंबई एक्स्प्रेसच्या ५ बोगी घसरल्या, दोघांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- झारखंडमधील जमशेदपूर येथे पहाटे ३.४३ वाजता मुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या पाच बोगी रुळावरून घसरल्या. रुळावरून घसरलेले डबे शेजारच्या रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. 

या अपघातात २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर १२ हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राजखरस्वान आणि बडाबांबो दरम्यान हा अपघात झाला असून जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात नेण्यात येत आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून चक्रधरपूर रेल्वे विभागाने सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडून मदत गाडी आणि सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत.



आज सकाळी झारखंडमध्ये हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी क्रमांक १२८१० चक्रधरपूरजवळ रुळावरून घसरली. हा अपघात चक्रधरपूर विभागात राजखरसावन वेस्ट आऊटर आणि बारांबू दरम्यान घडला. या घटनेत १२ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, प्रशासन तातडीच्या उपाययोजना करत आहेत. रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी सर्व जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार केले. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेदरम्यान ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले आणि त्यामुळे प्रवासी जखमी झाले.

चक्रधरपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम आदित्य कुमार चौधरी यांनी  सांगितले की, एक रिलीफ ट्रेन आणि अनेक रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीला प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी संसाधने देखील एकत्रित केली. सध्या रुळावरून घसरण्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group