एकीकडे आज देशात बकरीदचा सण साजरा होत आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. हा रेल्वे अपघात रंगपानी आणि निजबारी दरम्यान घडला, ज्यात मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मागून धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचनजंगा एक्सप्रेस न्यू जलपाईगुडी येथून निघाली होती आणि बिहारमधील किशनगंज मार्गे सियालदहला जात होती. दरम्यान, ती निजबारीसमोर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या मालगाडीने भरधाव वेगात असलेल्या मालगाडीला धडक दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. यादरम्यान रुळावरून घसरलेले बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजता रेल्वेचा अपघात झाला आहे. कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ;
हेल्पलाईन नंबर जारी
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी प्रवाशांचा आरडाओरडा सुरु झाला. अपघातानंतर NDRF, SDRF टीम आणि 15 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रशनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
मागील तीन डब्यांचे नुकसान
आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कंचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.