कसारा घाटात कंटेनरची 6-7 वाहनांना धडक; १४ प्रवासी जखमी
कसारा घाटात कंटेनरची 6-7 वाहनांना धडक; १४ प्रवासी जखमी
img
दैनिक भ्रमर
नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे.

एका कंटेनरने 6-7 वाहनांना धडक दिल्याने या अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे या महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

कसारा घाटातील ब्रेकफेल पाँईटजवळ हा अपघात झाला. या धडकेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान, घटनास्थळावर महामार्ग पोलिसांची पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group