कसारा घाटात सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला; २ जण जागीच ठार
कसारा घाटात सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला; २ जण जागीच ठार
img
दैनिक भ्रमर

इगतपुरी - मुंबई-आग्रा महामार्गावर सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंटजवळ सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळला. ही अपघाताची घटना आज पहाटे घडली. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून दरीत पूर्ण सिमेंट पसरले आहे. महामार्ग पोलीस केंद्र, घोटी व रूट पेट्रोलिंग टीमला माहिती मिळताच त्यांनी मदतकार्य केले.

त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. MH18 BG 9004 या क्रमांकाच्या ट्रकचा चालक सौद अहमद अन्सारी (वय 28 रा. अक्सा कॉलनी, मालेगाव) आणि त्याचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group