भास्कर सोनवणे
इगतपुरी - २४ फेब्रुवारीला मध्यरात्रीचे सुमारास इगतपुरीजवळ तळेगाव शिवारात कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझाच्या किचनच्या खिडकीचे गज कापुन हॉटेलमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम, काऊंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मद्य असा एकुण २ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल घरफोडी चोरी केला. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मागील दोन महिन्यांमध्ये इगतपुरी, घोटी परिसरात हॉटेल्स, वाईन शॉप मध्ये घरफोड्या करून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य चोरल्याप्रकरणी घरफोडीचे ४ गुन्हे दाखल होते. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गंभीर, नाउघड गुन्ह्यांचा आढावा घेतला. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी वरील घरफोडीचे गुन्ह्यामधील आरोपीतांची गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून माहिती घेतली असता, नजीकचे कालावधीत नाशिक शहर व मालेगावातील घरफोडी करणारे काही सराईत गुन्हेगार नुकतेच जामीनावर सुटलेले असून सध्या क्रियाशील आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपासाची चक्रे फिरवून नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन हमजा कुट्टी, वय ४५, रा. ओटवरम, बिल्कापुर, जि. मलपुरम, राज्य केरळ, हल्ली मु. शेवाळे चाळ, नवनाथ नगर, पेठरोड, नाशिक यास सतत तीन दिवस-रात्र पाळत ठेवून शिताफीने ताब्यात घेतले. ह्या आरोपीला वरील गुन्ह्यांच्या तपासात विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचे नाशिक शहर व मालेगावातील साथीदारांसह वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
याप्रकरणी हसन हमजा कुट्टी, वय ४५, रा. शेवाळे चाळ, नवनाथ नगर, पेठरोड, नाशिक, मुळ रा. केरळ,दिलीप रूमालसिंग जाधव, वय २३, रा. जेनेसीस पी. जी. फुलेनगर, नाशिक, मुळ रा. सेंदवा, मध्यप्रदेश, अनिल छत्तरसिंग डावर, वय २६, रा. जेनेसीस पी.जी., फुलेनगर, नाशिक, मुळ रा. सेंदवा, मध्यप्रदेश, मुस्तफा अब्दुल अन्सारी, वय २५, रा. चाळीसगाव फाटा, मालेगाव, मुळ रा. खेरटुंडा, झारखंड, सैय्यद इस्माईल सैय्यद जहुर, वय ४२, रा. अन्सारगंज, गल्ली नं. २, मालेगाव, जि. नाशिक, सईद शेख मजिद उर्फ सईद बुड्या, वय ३४, रा. जमहुर नगर, मालेगाव, मोहम्मद अस्लम अब्दुल सत्तार, वय ३८, रा. अख्तराबाद, मालेगाव, सैय्यद निजाम सैय्यद अन्वर, वय ४०, रा. आयशानगर, अनिस व्हिडीओ गल्ली, मालेगाव, हनिफ खान इकबाल खान, वय ३२, रा. जमहुर कॉलनी, ६० फुटी रोड मालेगाव, शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटींग, वय २६, रा. नुमानीनगर, मालेगाव ह्या आरोपीना मालेगाव शहर व नाशिक शहरातील फुलेनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
वरील गुन्ह्यांच्या समांतर तपासात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी घोटी पो.स्टे. गुरनं ६२३ व ५७२/ २०२३, भादवि कलम ४५७,३८०, इगतपुरी पो.स्टे. गुरनं ३२ व ३८/ २०२४, भादवि कलम ४५७,३८०, चाळीसगाव शहर पो.स्टे. जळगाव, गुरनं २० व २५ /२०२४, भादवि कलम ४५७,३८०, चाळीसगाव रोड पो.स्टे., धुळे, गुरनं २९ / २०२४, भादवि कलम ४५७, ३८०, ८) राहुरी पो.स्टे., अहमदनगर, गुरनं १९८ व २०२ / २०२४, भादवि कलम ४५७,३८०, ३७९,दिंडोरी पो.स्टे. गुरनं १०२ / २०२४ भादवि कलम ४५७,३८० हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ह्या गुन्ह्यांचा मास्टर माईंड हसन हमजा कुट्टी याच्या वर घरफोडीचे ३२ गुन्हे दाखल असून त्यापैकी ७ गुन्ह्यांमध्ये त्याला दोषसिध्दी झाली आहे. ह्या गुन्ह्यातील आरोपी शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटींग हा मालेगावातील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर खुन, दरोडा, जबरीचोरी यासारखे गंभीर ६ गुन्हे दाखल आहे.
यातील ताब्यात घेतलेले इतर सर्व आरोपी हे आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्यांचेवर दरोडा तयारी, घरफोडी, चोरी असे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी हसन कुट्टी याने मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर सुटल्यावर त्याचे वरील साथीदारांसह घरफोड्यांचे सत्र सुरू केले होते.
यातील आरोपीतांनी कबुली दिलेवरून घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले असून ह्या आरोपींनी वरील गुन्ह्यांमध्ये चोरून नेलेले विदेशी मद्य, मोटर सायकल, मोबाईल, आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिगा व इटियॉस कार आणि आरोपी हसन कुट्टी याने चोरीच्या पैशांतुन विकत घेतलेली मोपेड दुचाकी असा एकुण सुमारे १२ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
वरील आरोपीतांना इगतपुरी, घोटी व दिंडोरी पोलीस ठाणेकडील गुन्ह्यांमध्ये हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांनी घरफोडी करणारे आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे मोठे रॅकेट उघडकीस आणलेले आहेत. सदर आरोपीतांकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि हेमंत पाटील, पोउनि संदिप पाटील, पोउनि नाना शिरोळे, सपोउनि शिवाजी ठोंबरे, पोहवा चेतन संवस्तरकर, प्रविण सानप, किशोर खराटे, हेमंत गरूड, सतिष जगताप, पोना विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नरेंद्र कोळी, सुभाष चोपडा, शरद मोगल, पोकॉ योगेश कोळी, दत्ता माळी, विशेष पथकातील पोहवा संतोष हजारे, पोना विजय वाघ, सुनिल पाडवी, चंद्रकांत कदम यांचे पथकाने वरील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.