पर्यटकांनो सावधान...! भावली धरणाजवळ मोठी दरड कोसळली
पर्यटकांनो सावधान...! भावली धरणाजवळ मोठी दरड कोसळली
img
Dipali Ghadwaje
इगतपुरी :  इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून तालुक्याचे विशेष आकर्षण असणाऱ्या भावली धरण भागात मोठी दरड कोसळली आहे. धरणे ओसंडून वाहत असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. यातच दरड कोसळल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

पावसामुळे ह्या घटना सतत घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले असले तरी प्रशासनाचा वेळकाढूपणा चांगलाच नजरेस आला आहे. इगतपुरी तालुक्यात बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे.

यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. इगतपुरीला लागूनच सर्वांचे आवडीचे भावली धरण आहे. याच्या जवळच दरड कोसळली. यामुळे रस्त्यावर मोठे मोठे दगड पडले आहेत. नागरिक आणि पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group