भावली धरणाजवळ नियंत्रण सुटल्याने २ वाहने छोट्या पुलाखाली कोसळली
भावली धरणाजवळ नियंत्रण सुटल्याने २ वाहने छोट्या पुलाखाली कोसळली
img
दैनिक भ्रमर
 
इगतपुरी  :- इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या दोन वाहनांचा अपघात झाला आहे.

समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवायच्या प्रयत्नात भगतवाडी गावाजवळ हा अपघात झाला आहे. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहने रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या पुलावरून खाली कोसळले.

ह्या वाहनांमधील ४ जण जखमी झाले असून त्यांची नावे अद्याप कळाली नाहीत. इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group